Thursday, November 21, 2024 09:38:29 PM

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सईनं दिलं चाहत्यांना गिफ्ट !

सई ने स्वतःच्या वाढिवसानिमित्त &quot मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे.आणि त्याची गोष्ट देखील तितकीच मजेदार आहे



स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सईनं दिलं चाहत्यांना गिफ्ट  

 

काही दिवसापासून सई तिच्या समाज माध्यमांद्वारे स्टोरी मधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट टाकत होती यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची  चाहूल चाहत्यांना लागली होतीच परंतु ही उत्सुकता न लांबवता ह्याचा खुलासा झालेला आहे. आज सई ने वाढदिवसानिमित्त स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. २०२४ वर्ष सई साठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत असते आणि आता तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते ही गोष्ट नक्की काय ? या मागची गोष्ट काय हे सगळं सई सांगतेय ! 


सई ने स्वतःच्या वाढिवसानिमित्त " मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच मजेदार आहे. " क्वीन ऑफ स्यासी ट्यूड “ असा याचा अर्थ आहे !या ब्रँड बद्दल म्हणताना बोलते " ब्रँड लाँच करण ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण चाहत्यांच्या  मनात नुसत राहायच नाही तर उरायचं आहे आणि हे मी या निमित्ताने करू शकते म्हणून कायम आपल्या फॅन्स सोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँड मुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती आणि म्हणून हा ब्रँड लाँच होतोय. हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही म्हणून चाहत्यांसाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे. या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही आणि मी उद्योजिका फक्त पेपर वर झाली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल आणि असच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे"

ब्रँड च नाव काय असावा हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राने याला छान अस माझ्या पर्सनालीटी शोभेल असं नाव सुचवलं आहे आणि यातून " मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड आम्ही लाँच करतोय ! क्वीन ऑफ स्यासी ट्यूड सारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या Merchandise ला मिळाल आहे आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेन ! 

एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई एकीकडे बॉलिवुडवर अधिराज्य गाजवत आहे तर आता हे merchandise लाँच करून तिने स्वतः ची कल्पकता यातून दाखवून दिली आहे. २०२४ मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी असली तरी आता सई हा ब्रँड किती नावीन्यपण प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणार हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. बॉलिवुडला सईच्या अभिनयाची पडलेली भुरळ आता अता नवा कोरा ब्रँड या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत सई २०२४ वर्ष दमदार करणार यात शंका नाही !


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo